
Uddhav Thackeray : ...तर जीभ हासडून टाकू; उद्धव ठाकरेंचा थेट CM शिंदेंना इशारा
मुंबई - शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.
एसटीची गैरसोय होते आहे. लाज वाटत नाही आता स्वताचा हसरा चेहरा तिकडे लावला आहे. माझं कुटूंब माझी जबाबदारी हे मी म्हणत आलो आणि तो शब्द पाळला. ज्या गतीनं तुम्ही कुटूंब बदलता आहात हे काही बरोबर नाही.
कोकणातील रस्ते बदलण्याविषयी काही सुचना केल्या होत्या. पर्यटकाला उद्योजकाचा दर्जा दिला. त्योक्ते वादळाच्यावेळी मी पाहणी केली. आमच्या सरकारनं सगळ्यांना मदत केली होती. अनेकांना आधार दिला होता. कितीतरी कामं मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हालाच माहिती आहे. पण माशी शिंकली कुठे...असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
राजन साळवी काय देशद्रोही आहे का, काल परवा मिंधे बोलले की, बरं झालं आमचं देशद्रोहयाबरोबरचं चहापान टळलं, असं बोलणाऱ्यांची जीभ हासडून टाकू, मुंबई वाचवणारे शिवसैनिक तुम्हाला देशद्रोही वाटतात का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बर झालं देशद्रोह्यांसोबत चहापान टळलं, असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.