"पर्यायी व्यवस्था होईपर्यंत..." राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना केली विनंती

"पर्यायी व्यवस्था होईपर्यंत..." राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना केली विनंती
esakal

राज्यातील सत्तानाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा (Cm Uddhav Thackeray Resign) राजीनामा दिला. असे असले तरी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर कायम (Uddhav Thackeray who has asked him to continue in the post until an alternate arrangement is made maharashtra politics) राहणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्द्वारे जनतेशी संवादादरम्यान राजीनामा देण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यानंतर काही काळातच त्यांनी राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

कोश्यारी यांनी राजीनामा स्विकारला असला तरी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याचे आदेश राज्यपालांनी दिला आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरे यांची काय भूमिका असणार आहे हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजभवना शेजारील खंडोब मंदिराचे दर्शन घेतलं. त्यानंतर ते थेट त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर पोहोचले.

सर्वोच्च न्यायलयाने गुरुवारी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणार होती. मात्र या बहुमत चाचणीआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासह आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com