उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर, कारण...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

मुंबई : सध्या महाराष्ट्रात सत्ता स्थापनेला वेग आला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा सुरु आहे. याच कारणास्तव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 24 तारखेला ठरलेला अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा 24 तारखेला अयोध्या दौरा ठरला होता. याच दरम्यान त्यांची  काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा होणार होती. परंतू सध्या काँग्रेसकडून सत्ता स्थापनेला हिरवा कंदील नसल्याने ही भेट लांबणीवर पडली असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून कळते आहे.

शरद पवार-सोनिया गांधींची आज भेट- शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी (१८ नोव्हेंबर) भेट होईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले. या भेटीनंतर मंगळवारी प्रदेशच्या नेत्यांची त्यासंदर्भात चर्चा होईल. पर्यायी सरकार देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होऊन भूमिका ठरविली जाईल. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीची बैठक- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या बैठकीत सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षाने आघाडी करून लढविली होती. या बैठकीत राज्यातील राष्ट्रपती राजवट आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. पर्यायी सरकार देण्याच्या दृष्टीने या संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार आहे. त्यानंतर प्रदेश पातळीवरील नेतेही चर्चा करतील आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray's Ayodhya tour delayed