
Ramdas Kadam : लंडन, अमेरिका अन् श्रीलंकेत ठाकरेंचे हॉटेल्स? रामदास कदमांनी वाचला मालमत्तेचा पाढा
खेडः खेडच्या सभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टोकाची टीका केली आहे. खोक्यांच्या मुद्द्यावरुन त्यांनी ठाकरेंच्या परदेशात कुठे-कुठे आणि किती मालमत्ता आहेत, याचा पाढा वाचला.
रामदास कदम म्हणाले की, आमचे खोके काढण्यापूर्वी कुणाचे श्रीलंकेत, लंडनमध्ये हॉटेल्स आहेत. अमेरिकेत कुणाची प्रॉपर्टी आहे, हे मी काढणार आहे. एकदिवस मी राज्यासमोर हे सगळं काढणार असल्याचा इशारा रामदास कदम यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, माझ्याशिवाय उद्धव ठाकरे कधीच बाहेर पडायचे नाही. मी कायम सोबत असायचो. परंतु अशी वेळ आली की त्यांनीच मला पाडण्यासाठी प्रयत्न केले. दापोलीमध्ये योगेश कदमला पाडण्यासाठी त्यांनी काम केलं. याचे पुरावे आपल्याकडे असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.
काय म्हणाले रामदास कदम?
बाळासाहेब म्हणाले होते काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर हे दुकान बंद करील
परंतु उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांसोबत बेईमानी केली
भास्कर जाधवचे चमचे असतील, त्यांना म्हणावं बघा किती लोक आलेत. रस्ते ब्लॉक झालेत.
शिवसेना कुणाचीय हे एकनाथ शिंदेंनी आता सिद्ध करुन दाखवलंय
उद्धव ठाकरेंनी मलाही पाडण्यासाठी माणूस उभा केला होता.
परंतु जाधवची मला पाडायची औकात काय?
दापोलीतही योगेश कदम यांना पाडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला
योगेश कदमला पाडण्याच्या गटात उदयजी तुम्ही होतात पण कटात नव्हतात
तुम्ही सुभाष देसाईंसारख्या शेळ्यामेंढ्यांना सांभाळताय. बाळासाहेबांनी वाघ सांभाळले होते.