उद्धव ठाकरेंच्या मेव्हणीच्या कारला भीषण अपघात; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मेहुणी मेव्हणी मीना कारंडे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून त्या जखमी झाल्या आहेत. या अपघातात मीना यांचे नातेवाईक अजय विश्वनाथ कारंडे यांचा मृत्यू झाला आहे. तर मीना यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिर्डी-सिन्नर रस्त्यावर पांगरी गावाजवळ हा अपघात झाला आहे.

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मेहुणी मेव्हणी मीना कारंडे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून त्या जखमी झाल्या आहेत. या अपघातात मीना यांचे नातेवाईक अजय विश्वनाथ कारंडे यांचा मृत्यू झाला आहे. तर मीना यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिर्डी-सिन्नर रस्त्यावर पांगरी गावाजवळ हा अपघात झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चालकाला डुलकी लागल्याने वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांगरी गावाजवळ मोटार एका लहान पुलावरून खाली कोसळली. या अपघातात 3 प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तिघा जखमींना उपचारासाठी नाशिकच्या खासगी अपोलो रुग्णालयात दाखल केले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे चार वेगळ्या राज्यांत विभाजन करा; कोणी दिल्ला सल्ला?

घटनास्थळी सिन्नर ग्रामीण पोलिस दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. वीणा कारंडे यांची प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मीना यांचे नातेवाईक अजय विश्वनाथ कारंडे यांचा मृत्यू झाला असून मनिष मिश्रा आणि मीना या जखमी झाल्या आहेत. नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Image result for uddhav and rashmi thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackerays sister in law injured in car accident one died