अंगणवाडी सेविकांच्या लढ्याचे उद्धव ठाकरेंनी केले कौतुक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

आयुष्याचा स्टार्टअप जर कुपोषणाने होणार असेल तर पुढे काय होणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला उद्देशून केला.

मुंबई - अंगणवाडी सेविकांनी शिवसेना भवन येथे उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांनी जो लढा दिला त्यासाठी त्यांचं कौतुक करीत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. आयुष्याचा स्टार्टअप जर कुपोषणाने होणार असेल तर पुढे काय होणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला उद्देशून केला. तसेच 'मी अजून समाधानी नाही. जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही.' असेही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत पुढील ठळक मुद्दयांचा उल्लेख केला. 

- अंगणवाडी सेवकांचा लढा मोठा आहे.

-  लालबावटा आणि शिवसेना हे नातं जगजाहीर आहे.

-  शिवसेना सर्व काही उघड करते. शेतकरी आंदोलनालाही पाठिंबा दिला.

-  ज्याला विरोध करायचा आहे त्याला करतो, तो ही उघडपणे.

- कोणत्याही गोष्टीची प्राथमिकता शोधली पाहिजे.

- लाल बावटा घेऊन जो शेतकरी आला तो रक्ताने लाल झाला त्याचा हा लाल बावटा.

- एकीकडे उद्योग पतीना पायघड्या घालायच्या आणि सामान्य माणसाकडे दुर्लक्ष करणे हे मला पटणारे नाही. मग मी सत्तेचा विरोध करत नाही, उघड बोलतो.

 - शायनिग इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंफिया बोलून चालत नाही. अंगणवाडी सेविका जे करताहेत, तो खरा स्टार्ट अप आहे.

- अंगणवाडी सेविकांना जी सेनेने मदत केली हे श्रेयासाठी केलं नाही, तुम्ही कोणासोबत जायचं हे तुम्ही ठरवा.

-  सरकारच्या असा एक निर्णय दाखवा की मी लोकांसाठी घेतलेल्या निर्णयाला विरोध केला, जे काही आहे लोकांना मिळालं पाहिजे.

-  एकजूट असेल तर विजय नक्की होतो.

-  माझी ताकद मी तुमच्यासाठी वापरत आहे, याला बळ द्या.

- लाल बावटा आणि सेना यांचं नातं जुणं आहे, पण हे पावटे बसले त्यांना बदलायची गरज आहे.

- शिवसेना तुम्हाला न्याय हा पूर्ण मिळून देईल.
 

Web Title: Uddhav Thakarne has appreciated the fight for Anganwadi Sevaks