सेना मंत्र्यांचे राजिनामे घ्या - ठाकरेंकडे मागणी

तुषार खरात
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई - स्वपक्षीय मंत्र्यांविरोधात खदखदत असलेल्या संतापाला शिवसेना आमदारांनी अखेर आज उद्धव ठाकरे यांच्याजवळ मोकळी वाट करून दिली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत मंत्र्यांविषयीच्या तक्रारीचा पाढाच आमदारांनी वाचला. मंत्री कुचकामी असल्याने त्यांचे राजीनामे घेऊन त्या ठिकाणी नव्या मंत्र्यांना संधी द्यावी, अशी आग्रही मागणी आमदारांनी केल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेला पक्षपातीपणाची वागणूक देत असल्याबद्दलही यावेळी सविस्तर चर्चा झाली. 

सायंकाळी 6.30 वाजता सुरू झालेली बैठक रात्री 8.30 वाजता संपली. विशेष म्हणजे, इच्छूक सर्व आमदारांचे म्हणणे ठाकरे यांनी ऐकून घेतले. अनेक गंभीर बाबींविषयी स्वतः ठाकरे अनभिज्ञ होते. मंत्र्यांबाबतच्या गंभीर मुद्द्‌यांबाबत सर्व आमदार व सर्व मंत्री समोरासमोर बसून हे वाद निकाली काढूयात, असे ठाकरे यांनी सांगितले. मंत्र्यांविषयी स्वतः ठाकरे हे सुद्धा नाराज झाले आहेत, पण त्यांनी आमच्याजवळ स्वतःची भूमिका मांडली नाही. वस्तुस्थिती खातरजमा करून ते कुचकामी मंत्र्यांविषयी काहीतरी निर्णय घेतील, अशी अपेक्षा एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर "सकाळ'जवळ व्यक्त केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेला पक्षपातीपणाची वागणूक देत आहेत. विकासकामे, विविध योजना राबविताना भाजपला कसा फायदा होईल याचा विचार केला जातो. भाजपच्या आमदारांची कामे प्राधान्याने केली जातात. पण शिवसेनेच्या मतदारसंघाना फायदा होईल अशी विकासकामे केली जात नाहीत. शिवसेनेने सुचविलेल्या विकासकामांकडे दुर्लक्ष करतात, अशीही नाराजी आमदारांनी यावेळी व्यक्त केली. 

कर्जमाफीचा विषय तडीस न्या 

कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर सभागृहात सर्व आमदारांनी आक्रमक भूमिका घ्या. यावर ठोस निर्णय होईपर्यंत शांत बसू नका, अशा स्पष्ट सूचना उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना दिल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या विषयावर आम्ही उद्यापासून आणखी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे आमदारांनी "सकाळ'ला सांगितले. 

Web Title: Unhapph over ministers performance Shivsena MLAs meets Uddhav Thackeray