विद्यापीठांची नॅक मानांकनाकडे पाठ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

राज्यातील १० पैकी पुणे विद्यापीठ वगळता अन्य विद्यापीठांकडे नॅकचे ए प्लस मानांकनच (ग्रेड) नाही. विद्यापीठांनी त्यासाठी अर्जही केले नसल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या विद्यापीठांमधील बहिःस्थ विभाग बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

सोलापूर - राज्यातील १० पैकी पुणे विद्यापीठ वगळता अन्य विद्यापीठांकडे नॅकचे ए प्लस मानांकनच (ग्रेड) नाही. विद्यापीठांनी त्यासाठी अर्जही केले नसल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या विद्यापीठांमधील बहिःस्थ विभाग बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, विद्यापीठांनी ग्रेड मूल्यांकनाकडे पाठ फिरविल्याचा फटका राज्यभरातील तब्बल ४८ हजार बहिःस्थ विद्यार्थ्यांना बसला आहे. 

विद्यापीठातील बहिःस्थ विभाग सुरू ठेवण्यासाठी ‘यूजीसी’ने नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन बंधनकारक केले आहे. त्यामुळे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ; श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड;  मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमधील बहिःस्थ विभाग आता कायमस्वरूपी बंद झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University naac Grade UGC