विद्यापीठ उपकेंद्रासाठी विद्यार्थी राष्ट्रवादी आक्रमक

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 15 जानेवारी 2017

मुंबई - राज्यातील विविध विद्यापीठांच्या उपकेंद्रांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने आक्रमक रणनीती आखली असून, आतापर्यंत राज्यभरात हजारो विद्यार्थ्यांचा समावेश असलेले सात मोर्चे काढल्यानंतर आता विधानभवनवर लाखोंचा मोर्चा काढण्याची जय्यत तयारी केली आहे.

मुंबई - राज्यातील विविध विद्यापीठांच्या उपकेंद्रांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने आक्रमक रणनीती आखली असून, आतापर्यंत राज्यभरात हजारो विद्यार्थ्यांचा समावेश असलेले सात मोर्चे काढल्यानंतर आता विधानभवनवर लाखोंचा मोर्चा काढण्याची जय्यत तयारी केली आहे.

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने राज्यात विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न सोडविणे अत्यंत गरजेचे असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, 'राज्यात अनेक विद्यापीठांचे साधारणपणे चार ते पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे विद्यापीठाचे मुख्य केंद्र असलेला जिल्हा वगळता बाकी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अनेक कामांसाठी लांब अंतरावरील विद्यापीठ गाठावे लागते. एकाच कामासाठी विद्यार्थ्यांना अनेक वेळा विद्यापीठात हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे होणारे आर्थिक व शैक्षणिक नुकसान हे विद्यार्थ्यांना न परवडणारे आहे. याच कारणाने विद्यार्थ्यांकडून प्रत्येक जिल्हापातळीवर विद्यापीठ उपकेंद्राची मागणी पुढे येत आहे. या मागणीला अनुसरून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने 20 डिसेंबर ते 10 जानेवारीच्या कालावधीमध्ये राज्यभरात सात मोर्चे काढले.
(कोट)

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने यासाठी काढलेल्या मोर्चांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सरकारने या उपकेंद्राचा निर्णय तातडीने घ्यावा. अन्यथा विद्यार्थ्यांच्या संतापाला सामोरे जावे.

- संग्राम कोते-पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस

येथे हवीत उपकेंद्रे
1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - नगर व नाशिक.
2. शिवाजी विद्यापीठ - सांगली व सातारा.
3. संत गाडगेबाबा विद्यापीठ - बुलडाणा व वाशीम.
4. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - धुळे

Web Title: University students substation aggressive nationalist