अवकाळीचा पुन्हा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

पुणे - दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी विजेच्या कडाकडाटासह अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. या पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली असून द्राक्षे, कांदे, डाळिंब आदी पिकांचे काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सातारा, बीड, नाशिक जिल्ह्यांतील काही गावांत जोरदार पावसामुळे बंधारे भरून वाहू लागले आहेत. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून महिलेचा मृत्यू झाला आहे.  

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे. सोमवारी मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या भागात ढग जमा होऊन मध्यरात्रीनंतर अचानक पावसाला सुरवात झाली. त्यामुळे रब्बी ज्वारी, हरभरा यांसारख्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अन्य पिकांचे नुकसानही झाले आहे.  

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, शिरोळ या तालुक्यांना सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा बसला आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात असलेल्या माण, खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unseasonal rain in maharashtra