पुढील 2 दिवसांत राज्यात तापमानात वाढणार; हवामानचा अंदाज

मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा तडाखा वाढला आहे.
तापमान
तापमानईसकाळ

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्याच्या वातावरणात अचानक बदल झाला आहे. परिणामी पुढील दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होण्याची आणि त्यानंतर दोन ते चार अंशाने घसरण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं (IMD) ही माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा तडाखा वाढला आहे. दरम्यान, आता या तापमानामुळे थंडी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र नंतर या तापमानात पुन्हा घसरण होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.

तापमान
पुढील २४ तासांत 'या' राज्यांत गारठा वाढणार; हवामान विभागाची माहिती

दरम्यान, मागील काही दिवसांपासून देशासह राज्यातील विविध भागांत थंडीचा तडाखा वाढला आहे. काही शहरातील दिवसभराच्या तापमानात वाढ आणि घट होताना दिसत आहे. त्यामुळे ऊन असले तरी उन्हातही बोचरी थंडी व वातावरणात गारवा जाणवत आहे. याचा परिणाम भाजीपाला व प्रवासी वाहतुकीवर थेट झाला आहे. हवेत गारवा असल्याने काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्या आहेत.

राज्याच्या अनेक भागात अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. परिणामी सर्दी, खोकला, तापाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मात्र आता पुन्हा एकदा वातावरणात पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किमान तापमानात वाढ होण्याची आणि त्यानंतर घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तापमान
झारखंडमध्ये मोठी दुर्घटना; कोळसा खाणीत दबून १३ कामगारांचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com