UPSC 2019 Result : नेहा भोसले देशात पंधरावी, महाराष्ट्रात प्रथम

upsc 2019 result Neha Bhosale ranked 15th in the country and first in Maharashtra
upsc 2019 result Neha Bhosale ranked 15th in the country and first in Maharashtra

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१९ मध्ये घेतलेला परीक्षेचा निकाल  मंगळवारी सकाळी ऑनलाईन जाहीर केला. यामध्ये ८२९ जणांच्या निकालात प्रदीप सिंग हा देशातून अव्वल आला आहे. तर  महाराष्ट्रातील नेहा भोसले ही देशात १५वा तर महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील ५० पेक्षा जास्त जणांनी यश मिळवले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'यूपीएससी'ने नागरी सेवा परीक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये घेतली होती. तर, फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२० या काळात मुलाखती पार पाडल्या होत्या. कोरोना'मुळे जाहीर झालेल्या लाॅकडाऊन काळात मुलाखतींचे वेळपत्रक विस्कळीत झाले होते, मग 'यूपीएससी'ने पुन्हा एकदा वेळापत्रक जाहीर करून  उमेदवारांच्या आरोग्याची काळजी घेत मुलाखती पूर्ण करत आज निकाल जाहीर केला. 

यामध्ये ८२९ जणांची निवड यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील नेहा भोसले हिने देशातून १५वा रँक मिळवला आहे. तर या ३९ मराठी मुला-मुलींनी यात बाजी मारली असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या निकालात १८० आयएएस, २४ आयएफएस, १५० जणांची आयपीएस म्हणून निवड झाली आहे. तर सेंट्रल सिव्हिल ग्रुप ए साठी ४३८ व ग्रुप बी साठी १३५ जणांची निवड करण्यात आली आहे. या निकालात खुल्या गटातून ३०४, इडब्लूएस ७८, ओबीसी २५१, एससी १२९ , एसटी ६७ उमेदवार निवडले गेले आहेत. 

यांनी फडकावला मराठी झेंडा (कंसात रँक ) 
नेहा भोसले (१५), मंदार पत्की (२२), आशुतोष कुलकर्णी (४४) , प्रियंका किशोरे( ६१) , योगेश पाटील (६३), विशाल नरवडे (९१) ,  राहुल चव्हाण (१०९),  कुलदीप जंगम (१३५), नेहा देसाई (१३७), जयंत मंकाळे (१४३), अभयसिंग देशमुख (१५१), अश्विनी वाकडे (२००), सागर मिसाळ (२०४), महादेव गित्ते (२१०), कुणाल चव्हाण (२११), सचिन हिरेमठ (२१३),  सुमीत महाजन (२१४), सारांश महाजन (२२४), अविनाश शिंदे ( २२६), शंकर गिरी (२३०), श्रीकांत खांडेकर (२३१), योगेश कापसे (२४९), गौरी पुजारी (२७५), प्रसाद शिंदे (२८७), आदित्य काकडे (३८२) निमीश पाटील (३८९), मयांक स्वामी (३९३), महेश गिते (३९९), कांतीलाल पाटील (४१८)  स्वप्नील पवार ( ४४८), ऋषिकेश देसाई (४८१), नवनाथ माने (५२७), प्रफुल्ल देसाई (५३२), विजयसिंहगराव गिते(५५०), समीर खोडे (५५१), सुरेश शिंदे (५७४), अभिनव इंगवले (६२४), प्रियंका कांबळे (६७०) निखील खरे (६८७), सौरभ व्हाटकर (६९५), अक्षय भोसले (७०४), अभिजीत सरकाते (७१०), प्रज्ञा खंदारे (७१९), संकेत धनवे (७२७), शशांक माने (७४३), निखील कांबळे (७४४), राहूल राठोड (७४५), सुमीत  रामटेके (७४८), निलेश गायकवाड (७५२), कुणाल सरोटे (७६५), अभय सोनकर (७६७) वैभव वाघमारे (७७१), सुनील शिंदे (८१२), हेमंत नंदनवार (८२२), स्वरूप दीक्षित (८२७) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com