रेल्वे तिकिटांसाठी भिक्षेकऱ्यांचा होतोय वापर

Railway Ticket Counter
Railway Ticket Counter

अकोला : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या पाहता रेल्वे तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जात आहे. सर्वसामान्यांना न मिळणारी तत्काळची तिकिटे एजंटांमार्फत जादा पैसे देऊन सर्रास मिळत आहेत. भिक्षेकऱ्यांना रांगेत उभे करून त्यांच्याकडून तिकिटे काढून घेऊन एजंट ती चढ्या भावाने प्रवाशांना विकत असल्याचा गोरखधंदा शहरात सुरू आहे.

'आयआरसीटीसी'चे अधिकृत तिकीट विक्री केंद्र म्हणून महानगरपालिका चौकात असलेले राधे टूर्स आणि ट्रॅव्हल्सवर रेल्वे पोलिसांनी गुरुवारी छापा घालून पाच लाख रुपयांची ई-तिकिटे जप्त केली. "आयआरसीटीसी'च्या अधिकृत परवान्याच्या नावाखाली ही एजंट मंडळी अनेक युझर आयडी तयार करून लाखो रुपयांची तिकिटे काढतात व त्याची चढ्या भावाने विक्री करीत असल्याचा प्रकार शहरात सर्रास सुरू आहे. तसेच, रेल्वे स्थानकावर भिक्षेकऱ्यांना रांगेत उभे करून तत्काळची तिकिटे काढली जात असल्याचेही दिसून आले आहे. रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत आरक्षण खिडकीसमोर झोपून क्रमांक लावण्याचा मोबदला म्हणून भिक्षेकऱ्यांना दीडशे रुपये दिले जातात. 

अवैधरीत्या जर कोणी तिकीट विक्री करीत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांना कुठल्याही प्रकारची मदत लागत असेल, तर त्यांनी 182 या क्रमांकावर संपर्क साधावा. 
- विशेष नागर, पोलिस निरीक्षक, रेल्वे पोलिस दल, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com