#ViralSatya रात्रीच्या वेळी मोबाईल वापरल्याने डोळ्याचा कॅन्सर होतो?

गुरुवार, 19 जुलै 2018

मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचा कॅन्सर होतो असा दावा करण्यात आला आहे. त्याबाबतचा एक मेसेजही सध्या व्हायरल होतो आहे.

मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचा कॅन्सर होतो असा दावा करण्यात आला आहे. त्याबाबतचा एक मेसेजही सध्या व्हायरल होतो आहे. मोबाईल ही सध्या प्रत्येकाची गरज बनली आहे. मोबाईल जवळ नसला की अनेकांचा जीव कावराबावरा होतो. परंतू मोबाईलच्या अति वापरामुळे डोळ्यांचा कॅन्सर होतो असा दावा एका व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

'एक 40 वर्षीय व्यक्ती नेहमी रात्रीच्या वेळी मोबाईलचा वापर करत असे. त्यामुळे त्याचे डोळे लाल होत असे. या व्यक्तीला आता डोळ्यांचा कॅन्सर झाला आहे.' मेसेजमध्ये असा दावा करुन या व्यक्तीचा फोटोही सोबत व्हायरल करण्यात आला आहे. या फोटोत व्यक्तीचे डोळे लाल झालेले दिसतात.

या व्हायरल मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी आणि अशाप्रकारे रात्रीच्या वेळी मोबाईलचा वापर केल्यामुळे डोळ्याचा कॅन्सर होऊ शकतो का? हे जाणुन घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी लयलेश बारगजे यांनी नेत्रतज्ज्ञ राजीव मुंदडा यांना भेटले. रात्रीच्या वेळी चॅटिंगसाठी किंवा इतर कारणासाठी मोबाईल वापरल्याने डोळे लाल होतात, डोळ्यातून पाणी येते अशा गोष्टी होतात. यामुळे नजर कमी होऊ शकते परंतू कॅन्सर सारखा आजार होतो हे आतापर्यंत सिद्ध झालेले नाही असे डॉक्टरांनी सांगितले.

मोबाईल वापरताना काय काळजी घ्यावी?
- मोबाईलचा अतिवापर टाळावा
- मोबाईलचा ब्राईटनेस कमी ठेवावा
- अंधारात मोबाईल वापरु नये
- सतत 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरू नये

व्हिडीओ- 

Web Title: using mobile in dark causes eye cancer viral message