लखीमपूरमध्ये EVMवर टाकलं फेविक्वीक; सपाचं बटन केलं ब्लॉक

evm
evm

लखीमपुर खीरी: यूपीमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. या अंतर्गत नऊ जिल्ह्यांमध्ये मतदान सुरु आहे. या दरम्यानच आता लखीमपुर खीरी जिल्ह्यातील सदर विधानसभा मतदारसंघामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या ठिकाणच्या कादीपुर सानी पोलिंग बूथवर ईव्हीएम मशीनवर काही बदमाशांनी फेविक्वीक टाकल्याची घटना घडली आहे. समाजवादी पार्टीच्या बटनावर हे फेविक्वीक टाकण्यात आलं आहे. या प्रकारामुळे तब्बल दीड तास मतदानावर परिणाम झाला. (Uttar Pradesh Assembly Election 2022)

evm
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं ईडीसमोर आंदोलन

याबाबत बोलताना माजी आमदार आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार उत्कर्ष वर्मा यांनी म्हटलंय की, काहींनी खोडसाळपणा करुन ईव्हीएमवरील जे पहिलं बटन आहे, त्यावर फेविक्वीक टाकलं आहे. यामुळे ते बटन दाबलंच जात नाहीये. याबाबत आम्ही तक्रार केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. यामुळे जवळपास दीड तासांपर्यंत मतदान थांबलं होतं.

पुढे त्यांनी म्हटलंय की, आम्ही अशी मागणी करतोय, ज्याने हा खोडसाळपणा केलाय, त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जावी. सीसीटीव्हीमधून त्याचा चेहरा जरुर समोर येईल.

evm
मायावती कडाडून म्हणाल्या, समाजवादी पक्षाला मत देणं म्हणजे गुंडा राज आणणं

पोलिंग बूथमधील पहिल्या लाईनमध्ये असणाऱ्या एका मतदाराने म्हटलंय की, इथे सकाळपासून मतदान सुरु आहे. आम्ही लाईनमध्ये असतानाच कुणीतरी सांगितलं की, ईव्हीएमवर फेविकॉल टाकण्यात आला आहे. बटन दाबलं जात नाहीये. आम्ही जवळपास दोन तासांपासून उभे आहोत. अनेक अधिकारी आले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरु असून नऊ जिल्ह्यांमध्ये मतदान सुरु आहे. यामध्ये बांदा, फतेहपुर, हरदोई, लखीमपुर खीरी, लखनऊ, रायबरेली, सीतापुर, पीलीभीत आणि उन्नाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. याठिकाणच्या 59 जागांवर एकूण 624 उमेदवार मैदानात आहेत. गेल्या वर्षी यामधील 50 जागांवर भाजपने जिंकल्या होत्या. तर आठ जागांवर समाजवादी पार्टी तर प्रत्येकी दोन जागांवर काँग्रेस आणि बसपचा विजय झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com