Valentine Day
Valentine Day

व्हॅलेंटाइन डे 2019 : लिव्ह इन ते लग्नापर्यंतचा प्रवास

पुणे - राधिका आणि राघवनची कॉलेज कट्ट्यावरची ओळख. त्यांच्या गाठीभेटीचे ठिकाण ठरले ते मित्रांनी भाडेतत्त्वावर घेतलेली सदनिका (फ्लॅट). राघवनचा फ्लॅट राधिकाच्या ऑफिसशेजारीच होता. मग काय? आठवड्यातून एक-दोन नाही, तर रोज दोघांची भेट व्हायची... स्वत:चा फ्लॅट बंद ठेवून राधिका त्याच्याकडेच राहायची म्हणजे, त्यांच्या या प्रेमाची व्याख्या ठरली ती ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ची. त्यांच्या दृष्टीने खरंतर लग्न काय किंवा लिव्ह इन काय एकत्र राहणे महत्त्वाचे होते. नात्याला कुठलेही नाव न देता फक्त गाढ विश्‍वास ठेवून एकत्र राहायचे, असेही त्या दोघांना वाटले होते. परंतु, लग्न केले, तर आपल्या आनंदात कुटुंब आणि समाजही सहभागी व्हावा, असे त्यांना वाटले. त्यानंतर दोघांनी लग्नही केले.

लिव्ह इन रिलेशनमधून दोघांचे सूर जुळले आणि त्यांचे लग्न मांडवातील सनई-चौघडे, नातेवाईक आणि मित्रांच्या साक्षीने ते विवाहबंधनात अडकले. पुढची गंमत अशी, या दोघांनी ‘अरेंज मॅरेज’ असल्याचे सांगून, घरच्यांचाही मान राखला, हे दोघेही संसारात रमले आहेत. 

राधिका एका खासगी कंपनीत काम करते; तर राघवन वास्तुविशारद (अर्किॅटेक्‍ट) आहे. ‘कॉमन फ्रेंड ग्रुप’मध्ये दोघांची ओळख झाली, ती मैत्रीपर्यंत पोचली. मैत्रीच्या नात्यांत करार झाला, तो म्हणजे रोज एकदा भेटायचेच. हा अलिखित करार दोघांनीही पाळला. तो इतका, की त्यांच्या जवळीकतेला ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ने ओळखले जाऊ लागले, पण तोपर्यंत या नात्याची जवळकीने आयुष्याचे सूर जुळविले होते. लिव्ह इन रिलेशनशीप ही लांबची गोष्ट, पण आमचा प्रेमविवाह आहे, ही गोष्टही घरच्यांना पटविणे दोघांसाठी जिकिरीचे होते. घरातील परिस्थितीमुळे दोघांनी दूर व्हावे, असा नुसता विचारसुद्धा येताच त्यांच्या पोटात भीतीचा गोळा येत होता. तेव्हाच त्यांनी शक्कल लढविली, मैत्रींच्या माध्यमातून लग्नाची बोलणी सुरू केली आणि जेमतेम आठवडाभरात ‘गूड न्यूज’ आली. राघवन बोहल्यावर चढणार असल्याचा मुहूर्त जाहीर झाला. लग्नानंतर वर्ष-सव्वावर्षात दोघांना मुलगी झाली, दोघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम करिअर करीत आहेत. 

राधिका म्हणाली, ‘‘खरे लग्न वगैरे काही मनात नव्हते, केवळ ओळख आणि रोजच्या गप्पा हीच जीवनशैली होती. मात्र, बोलणे वाढले, एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊ लागलो. सुरवातीचा पर्याय म्हणून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात राहिले. केवळ स्वभाव आणि विचार जुळल्याने हे घडले.’’

प्रेमाचा तिसरा वाढदिवस
विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी १४ फेब्रुवारीला अर्थात ‘व्हॅलेंटाइन डे’च्या आदल्या दिवशी प्रपोझ करायचे, असे दोघांच्याही मनात होते. तोही मुहूर्त राधिका आणि राघवन यांच्यात जुळून आला. यंदा प्रेमाचा हा तिसरा वाढदिवस गुरुवारी (ता.१४) साजरा होणार असून, त्याचीदेखील दोघांनीही उत्साहाने तयारी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com