वंचित आघाडीत उभी फूट; आंबेडकरांवर गंभीर आरोप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

वंचित विकास आघाडीत उभी फूट पडली असून माजी आमदार लक्ष्मण माने यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधत त्यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनाही माने यांनी टोमणा मारला. पडळकर यांच्या आयत्या पिठावर रेघोट्या असल्याची टीका माने यांनी केली.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.

वंचित बहुजन आघाडी स्थापनेवेळी लक्ष्मण माने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, आता त्यांनीच बंड पुकारले आहे. आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपला पूरक भूमिका घेत असल्याचे माने यांनी म्हटले आहे. माने हे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. त्याचा आज स्फोट झाला. 

मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपमधून आलेल्या गोपीचंद पडळकरांना प्रकाश आंबेडकरांनी महासचिव बनवले. तसेच प्रवक्तेपदेही नेमले आले. अजून एक मुस्लिम नेते आहेत. ते भाजपमधून आले असून त्यांना सचिव बनवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे शिवसेना- भाजपच्या 10-12 जागा निवडून आल्या आहेत. तो निर्णय चुकीचा होता. तसेच, आंबेडकरांची कार्यशैली न रूचणारी आहे. 

वंचित विकास आघाडीत उभी फूट पडली असून माजी आमदार लक्ष्मण माने यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधत त्यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनाही माने यांनी टोमणा मारला. पडळकर यांच्या आयत्या पिठावर रेघोट्या असल्याची टीका माने यांनी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Aghadi ledar Laxman Mane criticize Prakash Ambedkar