मेल्यानंतर इथलेच कफन घेता ना; मग वंदे मातरम का म्हणत नाही?: एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई : विधानसभेत आज (शुक्रवार) वंदे मातरम् गीत गाण्यावरून गदारोळ झाला. सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदार प्रचंड आक्रमक झाले. एकमेकाकडे दोषारोप करत सदस्यांनी गोंधळ घातला. सत्ताधारी विरोधक आमने-सामने येत एकमेकाच्या समोर भिडतात की काय, अशी परिस्थीती निर्माण झाली होती. यावेळी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व समाजवादी पक्षनेते अबू आझमी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काल माध्यमांमध्ये वंदे मातरम् गीतासंबधी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थीत केला. 

अनिल गोटे म्हणाले, " समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वंदे मातरम म्हणण्यास विरोध केला आहे. या देशात राहून वंदे मातरम् ला विरोध केला जातो. इस देश रहेंना होगा तो वंदे मातरम् कहना होगा.'' त्यावर संतप्त झालेल्या आझमी यांनी बोलू देण्याची मागणी तालिका अध्यक्ष सुभाष साबणे यांच्याकडे केला. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ सुरू केला. त्यामुळे आझमी यांना बोलण्यास अडचण येत होती. त्यामुळे आझमी वेलमध्ये उतरले. त्यांच्या बाजूनी विरोधक आमदारही घोषणा देत होते. 

यावेळी बोलायला संधी मिळाल्यानंतर आझमी म्हणाले, " या देशात मोहब्बत फक्त गीत गाऊन होणार नाही. मुस्लीम आहे म्हणून विरोध का करता ? सारे जहाँ से आच्छा हिंदूस्ता हमारा हे गीत कोणी लिहले ? शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते काय ? अफजल खानांच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वकिल कोण होते? इंग्रजांच्या विरोधात लढणारे टिपू सुलतान कोण होते? माझ्या म्हणण्याचा चुकिचा अर्थ काढला जात आहे. मी एकदा नाही हजारदा देशाचा विजय असो, म्हणायला तयार आहे.''

या स्पष्टीकरणाने समाधन न झाल्याने भाजप आमदार एकनाथ खडसे यांनी अबू आझमी यांना खडसावले. ते म्हणाले, की "देशाच्या स्वातंत्र्याची लढाईही वंदे मातरम् या गीताने झाली आहे. मग आत्ताच का विरोध करता? मेल्यानंतर या जमिनीत पुरावं लागतं. इथलेच कफन घ्यावं लागतं, इथलीच हवा, इथलचं पाणी फुकट मिळतं मग या देशाला सलाम करायला काय अडचण आहे?,'' अशी विचारणा करत खडसे यांनी इस देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् कहेंना होगा, असे ठणकावले. 

यावेळी विरोधी बाकावरून बाजू मांडण्यासाठी अस्लम शेख उभे राहिल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी गोंधळाला सुरवात केली. एकमेकाविरोधात घोषणाबाजीने दणाणून गेले. यावेळी वेलमध्ये उतरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आमदारांना इशाऱ्यांनेच रोखले. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे सभागृहातील वातावरण शांत झाले.

नवीन कारागृहांची जयंत पाटील यांची मागणी

महापौर झाले म्हणून काय झाले.. झोका तर खेळणारच!

सरकारचा प्रस्ताव चुकीचा; महादेव जानकरांची कबुली

Web Title: vande mataram issue create ruckus in Maharashtra Assembly