वरंध घाट आजपासून 3 महिने वाहतुकीसाठी बंद; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Varandha Ghat closed for traffic for 3 months
Varandha Ghat closed for traffic for 3 monthsesakal
Summary

सध्या राज्यातील काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालीय.

रायगड : सध्या राज्यातील काही भागात मुसळधार पावसाला (Heavy Rain In Raigad) सुरुवात झालीय. त्यामुळं बऱ्याच घाटांत दरडी कोसळ्याचं प्रमाणही वाढलंय. यामुळं वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान, कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी (Western Maharashtra) जोडणारा सर्वात जुना मार्ग असलेल्या महाड-भोर, पुणे-पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाट (Varandha Ghat) अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, असा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी (Raigad Collector) बजावलाय.

महाड-पुणे मार्गावरील (Mahad-Pune Route) वरंध घाट धोकादायक ठरत आहे. काल (गुरुवार) दरड कोसळल्यानंतर वरंध घाट आजपासून तीन महिने अवजड वाहतुकीसाठी बंद ठेण्यात आलाय. अतिवृष्टीच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. वरंध घाटात सातत्यानं दरड रस्त्यावर खाली येत आहे. त्यामुळं रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी घाट बंद ठेवण्याची अधिसूचना काढलीय.

Varandha Ghat closed for traffic for 3 months
1989 च्या दंगलीत मुंबई होरपळत होती, तेव्हा एकनाथ शिंदेंनी वाचवला एका मुलाचा जीव

सध्या संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती आहे. तसेच रस्ता खचण्याची शक्यता लक्षात घेऊन घाट वाहतुकीसाठी बंद ठेण्याचा निर्णय घेतलाय. यामुळं अतिवृष्टीच्या काळात हा घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. याबाबतची सूचना रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (Raigad Collector Dr. Mahendra Kalyankar) यांनी काढलीय. दरम्यान, 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत घाट रस्ता बंद राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com