'अशी' असतील महाराष्ट्रातील सत्तास्थापनेची गणितं !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

  • निकाल लागले आता प्रतिक्षा सत्तास्थापनेची
  • काय असतील राजकीय गणितं? 
  • राज्यात नवी समीकरणं जुळणार? 

सगळे एक्झिट पोल फोल ठरवत राज्यातल्या जनतेनं धक्कादायक निकाल दिलाय. या निकालांनी भाजपच्या अपेक्षांवर पुरतं पाणी फेरलंय. त्यामुळे आता नवं राजकीय समीकरण काय असेल यावरून राजकीय वर्तुळात खल सुरू झालाय. या निवडणुकीच्या निमित्तानं काही राजकीय आडाखे देखील बांधले जाऊ लागलेत. काय असू शकतात ही राजकीय समीकरणं पाहुयात त्याविषयीच्या शक्यता.

शक्यता क्रमांक 1

  • सेना-भाजप सरकार स्थापन करणार
  • या निवडणुकीत भाजप-शिवसेना मिळून सत्तास्थापन करणं सहज शक्य आहे.
  • त्यामुळे पारंपरिक मित्र या नात्यानं पुन्हा एकदा भाजप-सेनेचं सरकार येईल. 

शक्यता क्रमांक 2 

  • शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस येणार एकत्र ?
  • 2014 मध्ये शिवसेनेला मागच्या दारानं सत्तेत सामील करून घेतल्यानंतर भाजपनं नेहमीच दुय्यम वागणूक दिली.
  • त्यामुळे यावेळी शिवसेना-राष्ट्रवादी-आणि काँग्रेस हे समीकरण जुळून येऊ शकतं. 

या निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकावर असला तरी भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता नागी. त्यामुळे सत्तेचा सोपान गाठण्यासाठी भाजपला शिवसेनेची गरज लागेल. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे संकेत दिले आहेत. 

BLOG | 'वंचित'ने आघाडीला विजयापासून ठेवलं वंचित.. | Result Analysis

अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन; काय बोलले अमित शाह ?

"महामुंबई" - सारे काही अपेक्षेनुसारच | Election Result Analysis 

अर्थात तुर्तास तरी सेना-भाजपचं सरकार स्थापन करेल अशी स्थिती आहे. मात्र सेनेनं सत्तेत समसमान वाटा मागितलाय. यातून जर राजकीय वारं फिरलं तर मात्र राज्यात निश्चितच वेगळं चित्र पाहायला मिळेल.

Webtitle : various possibilities before government formation in maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: various possibilities before government formation in maharashtra