
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन महिनाभरापेक्षा जास्त वेळ उलटून गेला आहे, त्यानंतर तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला. मंत्रिमंडळाचा विस्तारात भाजप-शिंदे गटाच्या १८ जणांचा समावेश करण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंख्यमंत्र्यांच्या सरकारी निवस्थान 'वर्षा' बंगल्यावर वास्तव्याला जाणार नाहीत.
महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्या-मोठ्या राजकीय घडामोडींचा साक्षीदार राहीलेला असून मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून ओळखला जाणाऱ्या वर्षाच्या मुख्य गेटवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेमप्लेट लावण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या आधीच्या म्हणजेच नगरविकासमंत्री असताना त्यांना देण्यात आलेल्या 'नंदनवन' या बंगल्यातच राहाणार आहेत. वर्षा बंगल्यावरील कार्यालयाचा वापर शिंदे यांच्याकडून बैठका घेण्यासाठी करण्यात येणार आहे, मात्र ते या बंगल्यावर वास्तव्यासाठी येणार नाहीत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शासकीय बंगला वर्षा येथून राज्याचा कारभार चालवला जातो, राज्याच्या राजकारणात वर्षा बंगल्याचे वेगळे स्थान आहे, तो कायम चर्चेत असतो. दरम्यान आज मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आज कार्यलयाची पाहणी केली. त्यानंतर छोटेखानी पूजाही पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर वास्तव्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री वर्षा, मंत्रालय आणि सह्याद्री अतिथीगृहावर रोजच्या बैठका घेणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 जून रोजी 'वर्षा' हे मुख्यमंत्र्यांते शासकीय निवासस्थान सोडलं होतं. तेव्हापासून हा बंगला रिकामाच होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावण्यात आली. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहायला जातात, मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली खरी मात्र ते वर्षावर वास्तव्याला गेलेले नाहीत त्यानंतर आता परंतु आता मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर वास्तव्यासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे.