यापुढे कोणतीही निवडणुक लढणार नाही; 'या' मोठ्या नेत्याने केली घोषणा

Vasai leader Hitendra Thakur says will not contest elections
Vasai leader Hitendra Thakur says will not contest elections

मुंबई : बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केली आहे. वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर हे यापुढे निवडणूक लढविणार नाहीत, पण राजकारणातून संन्यास घेणार नाही अशी घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीसाठी वसई, नालासोपारा आणि बोईसर ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. नालासोपारा येथे बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना युतीमध्ये अटीतटीची लढत आहे.

शिवसेनेने बहुजन विकास आघाडीसमोर कडवं आव्हान उभं केलं आहे. वसईत स्वत: हितेंद्र ठाकूर निवडणुकीला उभे आहेत तर नालासोपारा येथे शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर यांच्यासमोर कडवी झुंज देत आहेत.

यावेळी बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडे मुद्दे नसतील तर दहशतीचे आरोप करतात. प्रदीप शर्मा यांनी पैसे वाटले, पोलिस यंत्रणा हाती घेतली. गुंड कार्यकर्ते आणले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या गाडीला घेराव घातला. काही अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन त्यांना सोडलं. मी याबाबत लेखी तक्रार दिली आहे, असेही ठाकूर यावेळी म्हणाले.

दरम्यान, नागरिकांना पूर्ण सहकार्य करणार असून आपल्या तिन्हीही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचा म्हणून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मी निवडून येणार ही खात्री आहे. पुढच्यावेळीही या जागा कायम राहणार असा विश्वासही हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com