वसंत मोरेंची नाराजी दूर होणार? 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या भेटीला

वसंत मोरे यांनी वारंवार मनसेमधील "पार्ट टाईम" काम करणाऱ्या पदाधिकारी यांची तक्रार केली होती
MNS Latst news
MNS Latst news
Summary

वसंत मोरे यांनी वारंवार मनसेमधील "पार्ट टाईम" काम करणाऱ्या पदाधिकारी यांची तक्रार केली होती

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातली राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे वातावरण चिघळलं होतं. या कालावधीत अनेक घटना घडल्या. या भूमिकेमुळे मनसेला राजकीय धक्के बसले. काही मनेसे नेत्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. या सर्व घडामोडींनंतर आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. (MNS Latst news)

अशा अनेक राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर आज वसंत मोरे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती मिळत आहे. वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी 'शिवतीर्थ'वर वसंत मोरे आणि निलेश माझिरे यांनी त्यांची भेट घेतली आहे.

MNS Latst news
पुढील ४८ तासांत पाऊस, महाराष्ट्रात 2 दिवसांत मान्सून धडकण्याची शक्यता

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी निलेश माझिरे यांनी मनसेला राम राम ठोकला होता. त्यानंतर वंसत मोरेही मनसेवर नाराज होते. त्यामुळे आता या भेटीमुळे वसंत मोरे यांची नाराजी दूर होणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे. वसंत मोरे यांनी वारंवार मनसेमधील "पार्ट टाईम" काम करणाऱ्या पदाधिकारी यांची तक्रार केली होती. त्यावरून राज मनसे आणि वंसत मोरे हे सुत्र फिस्कटले होते. हीच तक्रार आज पुन्हा एकदा वसंत मोरे राज ठाकरेंकडे मांडणार का?, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.

MNS Latst news
राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार? शिराळा कोर्टाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

राज ठाकरेंनी जशी भोंगेविरोधी भूमिका घेतली तेव्हापासून वसंत मोरे पक्षात नाराज होते. प्रसारमाध्यांशी बोलताना त्यांनी ही नाराजी उघड उघड बोलून दाखवली होती. पक्षातील महत्त्वाच्या बैठकांना त्यांना आमंत्रण दिलं जात नाही, कधी त्यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत छापलं जात नाही. एकंदरित वसंत मोरे यांना काहीसं बाजूला सारण्याचं काम पक्षात होत आहे, असा आरोप मोरेंनी केला होता. त्यामुळे आता त्यांची नाराजी दूर होणरा का हे पाहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com