राहुल गांधी आणि काँग्रेस सेवा दलावर खटले दाखल करावेत : सावरकर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

या आधीही राहुल गांधी यांनी ''मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे" असं वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या सेवा दलाने वितरित केलेल्या एका पुस्तकावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यामुळे काँग्रेस सेवा दलासह काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी केली आहे. 

- इराणच्या धमकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सूचक इशारा

ते पुढे म्हणाले, या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आलो होतो. मला थोड्या वेळासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे, अशी विनंती केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही. सावरकरांबाबत माझ्याशी बोलण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मिनीट वेळ नसावा? हा सावरकरांचा अपमान आहे. त्यामुळे मी नाराज झालो आहे.'' 

- 'ते' सावरकर भाजपला मान्य आहेत का? : काँग्रेसचा प्रश्न

याप्रकरणी भाजपने काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''आमचे प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल खालच्या पातळीवरील लिखाण असलेली पुस्तिका काँग्रेसने वितरीत केली आणि आपली वाईट प्रवृत्ती पुढे आणली. तर शिवसेना सत्तेसाठी शांत बसली आहे. या पुस्तकाचा शिवसेना निषेध करणार की आपल्या आराध्यांचे अपमान सहन करणार? याचे उत्तर त्यांनी त्वरीत दिलेच पाहिजे.''

- Video : बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॅटिंगवर युवराज सिंग झाला फिदा!

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्याबद्दल या पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं आहे. या आधीही राहुल गांधी यांनी ''मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे" असं वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veer Savarkar grandson Ranjeet Savarkar demands for file defamation case against Rahul Gandhi