वाहन परवान्याला जूनपर्यंत मुदतवाढ

driving license
driving license

पुणे - देशात लॉकडाऊन असल्याने केंद्र सरकारने वाहनचालकांना दिलासा दिला आहे. वाहन परवाना (लायसन) तसेच वाहनांचे परमीट किंवा फिटनेस सर्टिफिकेटची मुदत १ फेब्रुवारीनंतर संपली असली तरी कागदपत्रे ३० जूनपर्यंत चालणार असल्याचे केंद्राने आदेशात म्हटले आहे. राज्य सरकारने याबाबतच्या सूचना राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिल्यावर केंद्राच्या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. 

सध्या अनेक शासकीय विभागांचे कामकाज बंद आहे. तसेच वाहतूकही बंद आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने ३० मार्च रोजी हा आदेश काढला आहे. त्यात म्हटले आहे की, वाहनचालकांच्या परवान्याची मुदत १ फेब्रुवारीनंतर संपली असली तरी त्याला पाच महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार ते लायसन ३० जूनपर्यंत वैध असेल. व्यावसायिक वापराच्या वाहनांचे परमीट, फिटनेस सर्टिफिकेट, नोंदणी पुस्तिका आदी संबंधित परवान्यांनाही ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबतचा आदेश काढला असला तरी, राज्य सरकारच्या परिवहन विभागाने या बाबतच्या नेमक्‍या सूचना राज्यातील ‘आरटीओ’ना देणे गरजेचे आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com