ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते पी. बी. कडू यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

कोल्हार - कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ नेते, थोर स्वातंत्र्यसेनानी व माजी आमदार पुंजाजी बापूजी ऊर्फ पी. बी. कडू पाटील (वय 96) यांचे गुरुवारी सकाळी सात्रळ (ता. राहुरी) येथे त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. "अप्पा' नावाने ते परिचित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सात्रळ, सोनगाव पंचक्रोशीतील गावांमध्ये "बंद' पाळण्यात आला. 

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय समितीचे अध्यक्ष अरुण कडू व सात्रळच्या प्रगती पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. विजय कडू, तसेच पुण्यातील सर्जन डॉ. विलास कडू हे त्यांचे पुत्र होत.

Web Title: Veteran Communist leader P. B. kadu dies

टॅग्स