भाजपमध्ये दाखल झालेल्या दिग्गजांना कार्यकारिणी यादीत स्थान नाही; कोण आहेत हे नेते

Politician
Politician

मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल जाहीर केलेल्या प्रदेश भाजप कार्यकारिणीची यादीत इतर पक्षांतून आलेल्या मातब्बर नेत्यांना पक्षपातळीवर संघटनेत स्थान देण्यात आलेले नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपच्या या रणनीतीमुळे भाजपत आयाराम उपरेच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांची दोन मुले, बेलापूरचे गणेश नाईक कुटुंब, नगरचे पिचड कुटुंबीय, तर कोल्हापूरचा महाडिक परिवार आदी राजकीय नेत्यांना भाजपने संघटनेत स्वीकारलेले नाही. 

राज्य भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये १२ प्रदेश उपाध्यक्ष, सहा प्रदेश सरचिटणीस व १२ चिटणीस यांचा समावेश आहे. त्या शिवाय सात मोर्चा आणि १८ विविध प्रकोष्ठाच्या नियुक्‍त्या जाहीर करण्यात आल्या असल्या तरी आयारामांना पक्षीय पातळीवर संधी देण्यात आलेली नाही. 

केंद्रात २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेनंतर देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपमधे प्रवेश करण्याचा सपाटा लावला होता. तोच कित्ता राज्यातही २०१९ च्या विधानसभा निवडणुका होऊन राज्यात सरकार स्थापन होण्यापर्यंत गिरवण्यात आला होता.

या नेत्यांच्या पदरी निराशा!
भाजपमध्ये दाखल झालेल्या दिग्गजांना पक्षात संघटना पातळीवर स्थान मिळेल, अशी चर्चा असताना नारायण राणे, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते, राधाकृष्ण विखे, सुजय विखे, संजयकाका पाटील, मधुकर पिचड, वैभव पिचड, शरद गावित, हिना गावित, संजय सावकारे, संजय काकडे, किसन कथोरे, उदयनराजे भोसले, शिवेंद्र भोसले, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक यासह अनेक नेत्यांच्या पदरी निराशाच आली.  

अपवादात्मक स्थान
बाहेरून आलेल्यांवर पक्षाने विश्‍वास दाखवला नसला तरी अपवादामध्ये आमदार प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या चित्रा वाघ यांना भाजपने उपाध्यक्षपद दिले आहे. नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांची विशेष निमंत्रित म्हणून बोळवण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com