कुलगुरू निवडीसाठी न्या. गोखले समिती नियुक्त

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई - अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती नियुक्त केली आहे.

समिती राज्यपालांच्या विचारार्थ कुलगुरुपदासाठी योग्य व्यक्तींच्या नावाची यादी सादर करेल. विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचा कार्यकाळ 13 ऑगस्ट रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही निवड समिती गठीत करण्यात आली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार समितीचे अन्य सदस्य असतील.

Web Title: vice chancellor selection justice gokhale committee