विदर्भात थंडीचा कडाका वाढला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पुणे - उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्याचा प्रवाह काही प्रमाणात विदर्भाच्या दिशेने वाहत आहे. यामुळे विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणात विदर्भाच्या तुलनेत थंडी कमी आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नागपूर येथे सर्वात कमी ७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

विदर्भात पुन्हा थंडी वाढली आहे. ही थंडी अजून एक ते दोन दिवस राहणार आहे. नागपूरपाठोपाठ गोंदियामध्येही तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली होते. अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या प्रमुख शहरांचा पारा १० अंशांच्यावर गेला असला तरी या भागात अजूनही थंडी आहे.

Web Title: Vidarbha Cold Increase