विदर्भात गारपिटीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे - पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. २४) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात रविवारपर्यंत पावसाची शक्यता असून, त्यांनतर किमान तापमानात घट होऊन थंडी पुन्हा वाढणार आहे.

पंजाब, हरियाना, राजस्थान, दिल्लीसह परिसरात पाऊस पडला असून, तुरळक ठिकाणी गारपीटही झाली अाहे. वायव्य राजस्थानपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय अाहे. पश्‍चिमी चक्रवात आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये परस्पर विरोधी क्रिया होणार आहे. यातच उत्तर भारतात असलेल्या थंड वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमध्ये आज आणि उद्या पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भात रविवारपर्यंत (ता. २७) पावसाची शक्यता आहे. तर उत्तर कर्नाटक, तेलंगणा, अांध्र प्रदेशच्या किनारपट्टीय भागात रविवारी हलक्या पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आहे. पाऊस थांबल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात ३ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली अाहे.

Web Title: Vidarbha Hailstorm Warning