विदर्भात पावसाच्या जोरदार सरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

पुणे - मॉन्सून सक्रिय असल्याने सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मध्यम स्वरूपाचा, तर मराठवाड्यात हलक्या सरी पडल्या. उद्या (ता. २४) विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, उद्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस उघडीप देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

सोमवारी दुपारनंतर पश्‍चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात दाट ढग जमा झाले होते. पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही हलके ढग होते. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींसह अधूनमधून ऊनही पडत होते. राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता असून, उद्यापासून कोकण वगळता राज्याच्या उर्वरित हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

Web Title: Vidarbha heavy rain