पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना युवकांचे 'व्हिडिओ लेटर'

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना युवकांचे 'व्हिडिओ लेटर'

मराठा समाज आज एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर का उतरतोय? या समाजाच्या मागण्या काय आहेत? इतरांचा मोर्चाकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय आहे, अशा विविध गोष्टींचा विचार करून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनोख्या पद्धतीने पोहचण्याचा प्रयत्न केलायं. मराठा क्रांती मूक मोर्चाविषयी आम्ही उच्चशिक्षित मुलांनी एकत्र येऊन एक व्हिडिओ तयार केला, त्यामध्ये मी निर्माता आणि निर्देशकाचा रोल निभावत आहे. अभियंता आणि मिडिया व इव्हेंट मॅनेजमेंटचा पदव्युत्तर शिक्षण मी घेतले आहे.

मी एका खेडेगावातील असून, माझे कुटुंबीय शेती करणारे आहे. माझ्या वडिलांना कशाप्रकारे त्रास झाला हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेले आहे. माझे स्वप्न अभिनेता किंवा दिग्दर्शक होण्याचे आहे. मी आता या क्षेत्रात करिअर घडवित आहे. या व्हिडिओमध्ये सुमेध कंकाळ हा सहदिग्दर्शक आहे. तो जातीने दलित आहे. अभिनेता गोपाल खंडाळे हा सुद्धा अभियंता आहे. श्रीगोरे, राग व्यक्त करणारा अमोल हे ओबीसी असून, प्रसाद कवले हा दलित, उमर शेख मुस्लिम, आकाश राठोड बंजारा, अद्वैय मानगावकर तेली, सुरज ठाकुर, पीयूष पाटील, ऐश्वर्या कणसे अशी सर्वांनी एकत्र येऊऩ हा व्हिडिओ तयार करून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे आमचे म्हणणे मांडत आहोत. 

सर्व जाती-जमातीच्या मुलांनी एक व्हिडिओ लेटर प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. असे करण्यामागचा आमचा उद्देश फार वेगळा आहे. मेट्रो शहरांमध्ये या मोर्चाबद्दल उलटसुलट चर्चा आहे, राजकीय विश्लेषक यास इतर राजकीयपक्ष प्रमुखांचे फडणविसांविरुद्धचे दव्ंदव, तसेच हा दलितांविरुद्ध कट आहे, असे तर्कवितर्क लावत होते. परंतु या मोर्चामागील मुळ कारण बाजुला राहत होते. आजवर मराठा समाजाचे बरेच मुख्यमंत्री, मंत्रा समाजकारणात व राजकारणात असुन देखील हा समाज उपेक्षीत राहिला. बहुतांश समाज शेती करतो, समाजातील प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन गावगाडा चालवितो, पण त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य आतापर्यंत कोणीच घेतले नव्हते.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्यामध्ये बहुंताश मराठा शेतकरी होते. माझा बाप ही एखाद्या दिवशी आत्महत्या करतो की काय? अशी भिती शहरात शिक्षण घेत असलेल्या मुलांना वाटत होती. शिक्षणात चांगले गुण मिळवून देखील आपण मागे आहोत, हे शल्य त्यांना टोचत होते. त्याउलट पुढाऱ्यांची मुले सक्षम नसतानाही त्यांना परदेशात उच्च शिक्षण मिळते. पुढे ती राजकारणात उत्तराधिकारी म्हणून येतात. या सर्व गोष्टींमुळे आज हा समाज पेटून उठला आहे. हा राग, संताप कुण्या एकाविरुद्ध नव्हे तर समाजात बहुजन असूनही उपेक्षीत असल्याचे शल्य आहे. आज हा समजा कोणत्याच नेत्याला किंवा संघटनेला मानायला तयार नाही. सकल मराठा या नावाने स्वखर्चाने या समाज मोर्चामध्ये सहभागी होत आहे.

आजचा युवकवर्ग पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारतोय. हा समाज आर्थिकदृष्ट्या फार मागे राहिला आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिला आहे. त्यामुळे आता या मोर्चाच्या रुपाने आता नाही तर कधीच नाही म्हणून पेटून उठला आहे. याच्या काही मागण्या ज्या रास्त आहेत व योग्य आहेत त्याचे विनाकारण राजकारण केले जाऊ नये. सामाजिक बांधिलकी जपून तेढ निर्माण होऊ नये हा या व्हिडिओमागील उद्देश आहे. सर्वप्रथम एक युवक म्हणून आणि नंतर कलाकार म्हणून कश्यापद्धतीने जागरुकता आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. रोष, मागण्या किंवा मते मांडण्याची अनेक माध्यमे आहेत. कोणाला लिहियाला, भाषणातून, मोर्चातून व्यक्त व्हायला आवडते. आम्ही कलाकार म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त झालो आहे. बघा आपणास कसे वाटते...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com