esakal | पोलिसांची मुजोरी ! शिवसेनेच्या 'या' नेत्यास पोलिसांनी नेले फरफटत; व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना पाठविला 
sakal

बोलून बातमी शोधा

IMG-20200710-WA0139.jpg

डबलसीट गेलेल्या मुलाला सोडविण्यासाठी गेल्यानंतर... 
शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये या उद्देशाने पोलिसांकडून डबलसीट वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शुक्रवारी (ता. 10) शिवसेनेचे कामगार नेते विष्णू कारमपुरी यांचे चिरंजिव दुचाकीवरुन डबलसीट जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले आणि त्याला सोडविण्यासाठी विष्णू कारमपुरी त्याठिकाणी पोहचले. दंड भरतो गाडी द्या, अशी विनंती केली. त्यांनी शहरातील अन्य डबलसीट वाहनांचे उदाहरण देत मोठ्या आवाजात बोलण्यास सुरवात केली. त्यानंतर साहेबांना मोठ्या आवाजात बोलतो का म्हणत पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्‍काबुक्‍की करीत फरफटत पोलिस व्हॅनकडे नेले. त्यावेळी तोल जाऊन ते जमिनीवर पडले. 

पोलिसांची मुजोरी ! शिवसेनेच्या 'या' नेत्यास पोलिसांनी नेले फरफटत; व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना पाठविला 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. मात्र, शुक्रवारी (ता. 10) डबलसीट प्रवास करणाऱ्या मुलास पकडल्यानंतर दंड भरुन गाडी सोडून द्या, ऐकून घ्या, अशी विनंती करणाऱ्या शिवसेनेच्या कामगार नेत्यास पोलिसांनी अक्षरश: गच्चीला पकडून फरफटत नेले. साहेबांना मोठ्या आवाजात बोलतो का म्हणत पोलिसांनी विष्णू कारमपुरी यांच्या गच्चीला धरत पोलिस वाहनाकडे ढकलत नेले. या घटनेची तक्रार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडेही करणार असून सोशल मिडियातून व्हायरल झालेला व्हिडिओही त्यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ग्रामीण पोलिसांनी दोनच दिवसात मोठ्या प्रमाणावर कारवाई करीत साडेदहा लाखांचा दंड वसूल केला. त्यानंतर शहर पोलिसांनी गुरुवारपासून शहरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरवात केली. मात्र, कामगारांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या शिवसेनेच्या सोलापुरातील ज्येष्ठ नेत्यास पोलिसांनी दिलेली वागणूक चुकीची असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. साहेबांना मोठ्या आवाजात बोलतो का, असा जाब विचारात पोलिस कर्मचाऱ्यांनी हे कृत्य केले. श्री. कारमपुरी यांनी याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले आहे. 

कारवाईच्या आकडेवारीत घोळ 
ग्रामीण पोलिसांच्या तुलनेत शहर पोलिसांच्या कारवाईत सातत्य दिसत नसल्याने अद्याप डबलसीट वाहनचालकांची संख्या कमी झालेली नाही. शहर पोलिसांनी गुरुवारी (ता. 9) डबलसीट जाणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. सुरवातीला पोलिस आयुक्‍तालयाकडून शहरात 737 वाहनांवर कारवाई करीत एक लाख 10 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यात बदल करीत 310 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली, तर 189 दुचाकी आणि दोन चारचाकी वाहने जप्त केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नेमकी किती वाहनांवर कारवाई केली, हे गुलदस्त्यातच राहिले.  