
Viral Video : छेड काढली अन् विषयच संपला! गौतमीने गर्दीत घुसून तरुणाला तुडवलं
मुंबई - सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील ही चांगलीच व्हायरल झाली आहे. सांगली जिल्ह्यातील बेडग गावामध्ये झालेल्या तिच्या लावणीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी लोटली होती. या गर्दीमुळे जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. मात्र गर्दीमुळे गौतमी पाटील हिला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. ( Gautami Patil news in Marathi)
हेही वाचा: Gautami Patil: गौतमी पाटील राजकारणात येणार का? म्हणाली...
गौतमी पाटील हिचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील छेड काढणाऱ्या तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तीन महिने जुना असल्याचं सांगण्यात येत आहे.
गौतमी पाटील हिच्या लावणीच्या कार्यक्रमाला तरुणांची मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेकदा तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात येते. अशीच घटना घडली होती. यावेळी संतप्त झालेल्या गौतमीने तरुणाला मारहाण केल्याचा दावा कऱण्यात येत आहे.
हेही वाचा Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?