विधान परिषदेत भाजप सर्वांत मोठा पक्ष

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जुलै 2018

नागपूर - विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध झाल्याने विधान परिषदेत भाजप- शिवसेना युती बहुमतामध्ये आली आहे. 21 या संख्याबळानुसार भाजप परिषदेत सभागृहात सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे, त्यामुळे भाजप सभापतिपदावर दावा करणार असल्याचे नक्की झाले आहे. आगामी अधिवेशनात भाजप सभापतिपदावर दावा सांगण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेला उपसभापतिपद मिळू शकते.

विधान परिषदेत आतापर्यंत संख्याबळानुसार सर्वांत मोठा पक्ष राहिलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ घटले आहे, ते 17 पर्यंत खाली आले आहे. ही विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याने भाजपचे संख्याबळ वाढत 21 वर जाऊन भाजप वरच्या सभागृहातील संख्याबळाने मोठा पक्ष ठरला आहे. आज झालेल्या बिनविरोध निवडणुकीमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. सध्या भाजप- 21, राष्ट्रवादी कॉंग्रेस- 17, कॉंग्रेस- 17, शिवसेना- 12, लोकभारती- 1, पीआरपी ( जोगेंद्र कवाडे )- 1, राष्ट्रीय समाज पक्ष- 1, शेकाप- 1, अपक्ष- 6 असे संख्याबळ आहे. एक जागा रिक्त (पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त) आहे.

भाजप 21, शिवसेना 12, अपक्षांतील प्रत्येकी तीन सदस्य हे शिवसेना- भाजप समर्थक सदस्य आहेत. विरोधकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस- 17, कॉंग्रेस- 17, लोकभारती- 1,
शेकाप- 1, पीआरपी- 1,अपक्ष- 1 असे संख्याबळ आहे. या संख्याबळाच्या जोरावर आगामी हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांकडून सभापती आणि उपसभापतिपदावर दावा केला जाऊ शकतो. त्यानुसार भाजपला सभापतिपद, तर शिवसेनेला उपसभापतिपद मिळू शकते.

नव्या सभापतींसाठी...
- विद्यमान सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणावा लागेल.
- शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज
- शिवसेना तसा पाठिंबा देणार का, हा प्रश्न

Web Title: Vidhan Parishad BJP Big Party Politics