मुंबई शिक्षक पदवीधर निवडणूक, मतमोजणीला सुरुवात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली असून यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अंतिम निकाल सायंकाळी 5 वाजेपर्यत येण्याची शक्यता आहे.मतमोजणी प्रक्रियेमुळे निकालास थोडा विलंब लागण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर 24 मधील पाम बीच भागातील आगरी सांस्कृतिक भवनमध्ये मतमोजणीला सुरवात झाली आहे. या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल आहे. य  परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे. परिसरामध्ये भाजप, सेना, शेकापसह आदी पक्षाचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे.

या निवडणुकीचे मतदान 25 जूनला बॅलेट पेपरद्वारे घेण्यात आले होते. या बॅलेट पेपरचे गठ्ठे एकत्र करून त्याची जमवाजमव करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आज काही वेळ लागला. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
सर्वात जास्त मतपत्रिका या कोकण पदवीधर मतदार संघातील असल्याने या मतदार संघाचा अंतिम निकाल सायंकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर या दोन्ही मतदार संघातील निकाल दुपारी 3 ते 5 दरम्यान लागण्याची शक्यता आहे. 

Web Title: vidhan parishad election result vote counting