विधानसभा निवडणुकीत ‘या’ शब्दांचीच झाली चर्चा; सोशल मीडियावर धुमाकूळ

मंगेश कोळपकर
Friday, 25 October 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यात पहिलवान या शब्दावरून वाक् युद्ध रंगलं होतं. त्याची संपूर्ण निवडणुकीत चर्चा रंगली होती.

पुणे : या वर्षी मे महिन्यात लोकसभा आणि ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. राजकीय सभांचा विचार केला तर, लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक जास्त रंगतदार ठरली. या निवडणुकीत स्वतः शरद पवार यांनी महाराष्ट्रभर रान उठवलं. त्यांची प्रत्येक सभा गाजली. भाजपला याचा अंदाज आल्यामुळेच त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यात पहिलवान या शब्दावरून वाक् युद्ध रंगलं होतं. त्याची संपूर्ण निवडणुकीत चर्चा रंगली होती. निवडणुकीच्या सरुवातीपासून हे वाक् युद्ध रंगले ते शेवटपर्यंत रंगतच गेले. या पहिलवान या शब्दाच्या बरोबरीनेच इतरही अऩेक शब्द या निवडणुकीत चर्चेला आले.

भाजपच्या किती प्रभावाखाली रहायचं, हे शिवसेनेनं ठरवावं

तेरी मेरी यारी 60 वर्षांनंतरही लई भारी

No photo description available.

निवडणुकीत चर्चा झालेले शब्द

 1. पहिलवान
 2. तेल लावलेला पहिलवान
 3. चंपा
 4. पार्सल
 5. काळू-बाळूचा तामाशा
 6. नाचे
 7. नवा घरोबा
 8. तंगड तोडू
 9. शेंडाही नाही, बुडकाही नाही
 10. चंपादाजी
 11. महापुरातून वाहून आलेला मंत्री
 12. उकिरडा
 13. कुंकू किती वेळा बदलणार?

मी अजून संपलेलो नाही : उदयनराजे 

अजित पवार यांचा खुलासा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या दोन पत्रकार परिषदा खूप गाजल्या. एका पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख ‘चंपा’ असा केला. तर, दुसऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा शब्दप्रयोग करण्याचे कारणही स्पष्ट केले. भाजपमधील एका ज्येष्ठ मंत्र्यानेच हा शब्द प्रयोग सुरू केल्याचा खुलासा अजित पवार यांनी पत्रकारांपुढे केला होता. या दोन्ही पत्रकार परिषदांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 maharashtra popular words in election campaign