Vidhan Sabha 2019 : 'पाडा रे...' गाण्याची सोशल मीडियावर धूम!

Pada-Re-Song
Pada-Re-Song

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काही तासांनी थंडावणार आहे. प्रचार सभा संपण्यास आता शेवटचे काही तास शिल्लक राहिले आहेत. दोन दिवसांनी मतदान होणार असताना राज्यभरात सोशल मीडियावर एक गाणे धुमाकूळ घालत आहे.

सोशल मीडियावरील हे रॅप साँग सध्या चर्चेला विषय ठरत आहे. 'पाडा रे' असे या गाण्याचे बोल असून सत्तेच्या लालसेसाठी पक्ष बदली करणाऱ्या नेत्यांवर या गाण्याचा पूर्ण रोख राहिला आहे. जनतेशी गद्दारी करणाऱ्यांना जनता यावेळेस पाडल्याशिवाय राहणार नाही, सत्तेसाठी कमळाबाईच्या टोळीत सामील झालेल्यांना आम्ही काय पाडल्याशिवाय राहत नाही, सत्तेसाठी इमान विकून बेईमानांशी हात मिळविणाऱ्यांना पाडा रे, जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना पाडा रे, देशाची सद्यस्थिती आज फार वाईट आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी वाढली, देश आर्थिक संकटात सापडलाय, त्याचं त्यांना काही नाही, जो एकाचा नाही, तो लोकांचा नाही, त्यामुळे यांना पाडा रे असे हे गाणे सांगत आहे.

यंदा निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभांमध्ये जेवढी रंगत आली, तेवढीच रंगत सोशल मीडियावरही आल्याचे पाहायला मिळाले. पारंपारिक प्रथेप्रमाणे प्रचारासाठी सर्वपक्षांनी जाहीर सभा घेतल्या. मात्र, तरुणांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियावरही वेगळ्या पद्धतीने प्रचाराची आखणी केली होती.

जाहीर सभांमध्ये कुस्तीवरून प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यावर डाव टाकले जात होते. त्यामध्ये भाजप नेते आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी कृषिमंत्री शरद पवार हे आघाडीवर होते. तर सोशल मीडियावरही भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्येच युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. भाजपने रम्याचे डोस असे सदर चालवले. तर राष्ट्रवादीने सध्याच्या काळात लागू होतील अशा मराठी म्हणींवरून विरोधकांवर निशाणा साधला होता. 

या अगोदरही काही रॅप साँगद्वारे प्रचार केला जात होता. आता शेवटच्या टप्प्यात यामध्ये आणखी एका रॅप साँगची भर पडली आहे. मात्र, हे रॅप साँग कोणत्याही एका नेत्यावर किंवा पक्षावर आधारित नसून जे नेते सत्तेच्या लालसेसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले, त्या नेत्यांवर आधारित आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com