Vidhan Sabha 2019 : साताऱ्यात माणमधील उद्धव ठाकरेंची सभा रद्द; काय आहे कारण?

Vidhan Sabha 2019 : साताऱ्यात माणमधील उद्धव ठाकरेंची सभा रद्द; काय आहे कारण?

दहीवडी (सातारा) : एखाद्या उमेदवारासाठी त्याच्या पक्षप्रमुखाची प्रचारसभा अतिशय महत्त्वाचा विषय असतो. पण, आज, माण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार शेखर गोरे यांच्यासाठीची उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. महायुती जाहीर झाली असूनही, माण मतदारसंघात भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे राज्यात ही लढत लक्षवेधी ठरत आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

महाराष्ट्रात कणकवली आणि माण हे दोनच मतदार संघातील निवडणूक भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या समोर उभी आहे. माणमध्ये दोन सख्ये भाऊ भाजप आणि शिवसेने कडून एकमेकांच्या विरोधात ही लढाई लढत आहेत. दोन्ही पक्षांनी मतदारसंघात पूर्ण ताकद लावली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या आधीच जयकुमार गोरेंसाठी म्हसवडला सभा घेतली होती. आज शेखर गोरे यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा दहिवडी येथे होणार होती. त्याची जय्यत तयारी सुद्धा झाली. परंतु, खराब हवामानामुळे उद्धव ठाकरेंना शेवटच्या क्षणाला हा दौरा रद्द करावा लागला. परंतु, दोन्ही पक्षाने ही लढाई प्रतिष्ठतेची केल्याने उद्धव ठाकरेंनी थेट फोनवरून जनतेशी संवाद साधला आणि आज मी येऊ शकत नाही. पण, शेखरसाठी उद्या मी येतोय असे सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह दिसून आला.

तिरंगी लढत

माण मतदारसंघात तिरंगी लढत आहे. या गोरे बंधूंच्या बरोबरच प्रभाकर देशमुख हे माजी सनदी अधिकारी अपक्ष रिंगणात आहेत. त्यांना इतर सर्व पक्षांनी दोन्ही भावांना आव्हान दिले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती केली आहे. या मतदार संघातील ही निवडणूक या वेळेस रंगतदार होऊन धक्कादायक निकाल देऊ शकते, अशी चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com