Vidhan Sabha 2019 : काँग्रेसची यादी दोन दिवसांत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी येत्या दोन दिवसांत काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

विधानसभा 2019 
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी येत्या दोन दिवसांत काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यातच पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून, आता काँग्रेसचीही यादी प्रसिद्ध होणार आहे. यात माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदारांचा समावेश होणार असल्याचे समजते.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, २१ ऑक्‍टोबर रोजी मतदान आणि २४ ऑक्‍टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे युती आणि काँग्रेस आघाडीकडून उमेदवारांच्या यादीवर काम सुरू आहे. शिवसेना आणि भाजप युतीच्या बैठका सुरू असल्या, तरी जागावाटप आणि उमेदवारांच्या याद्या तयार करण्यात दोन्ही काँग्रेसने बाजी मारली आहे. निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेस प्रत्येकी १२५ जागा लढविणार असून, उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. उर्वरित जागा या मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आदींसाठी सोडण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Congress list in two days