पुणे: राज्यातील सख्ख्या दोन भावांच्या जोड्या विधानसभेत दाखल झाल्या असून, ते यापुढे विधानसभेत दिसणार आहेत. हा विक्रम केला आहे लातूर मधील देशमुख बंधूंनी आणि सोलापूरच्या शिंदे बंधूंनी.
विलासराव देशमुख यांचे दोन पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी यावेळी नशीब आजमावले आणि विजय मिळवला. तर सोलापुरात बबन शिंदे आणि संजय शिंदे बंधूंनीही विजयश्री मिळवला आहे.

अमित देशमुख यांनी हॅटट्रिक साधत तब्ब्ल 40 हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला. भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांचा त्यांनी पराभव केला. धीरज देशमुख यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. लातूरमधून अमित व धीरज हे दोघे बंधू विजयी झाले आहेत.
माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी विजय मिळवला. विधानसभेवर निवडून जाण्याची बबन शिंदे यांची ही सलग सहावी वेळ आहे. संजय शिंदे यांनी यंदा अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय मिळला. संजय शिंदे हे आमदार बबन शिंदे यांचे धाकटे बंधू आहेत.