विधानसभा 2019 : आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघाची चाचपणी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ग्रामीण भागातून निवडणूक लढवावी यासाठी मतदारसंघाची पाहणी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंनी ग्रामीण भागातून निवडणूक लढवायची झाल्यास कोल्हापूर, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव ग्रामीण किंवा मालेगाव बाह्य (नाशिक) हे मतदारसंघ सुरक्षित असल्याचे आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघाची निवड करणाऱ्या टीमचे निष्कर्ष आहेत.

विधानसभा 2019 : मुंबई - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ग्रामीण भागातून निवडणूक लढवावी यासाठी मतदारसंघाची पाहणी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंनी ग्रामीण भागातून निवडणूक लढवायची झाल्यास कोल्हापूर, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव ग्रामीण किंवा मालेगाव बाह्य (नाशिक) हे मतदारसंघ सुरक्षित असल्याचे आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघाची निवड करणाऱ्या टीमचे निष्कर्ष आहेत.

आदित्य ठाकरेंसाठी शहरातील काही मतदारसंघ सुरक्षित असले तरी राज्याचे नेतृत्व करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी ग्रामीण भागातून निवडणूक लढविल्यास त्याचे वेगळे मोल असेल, असा निष्कर्ष आदित्य ठाकरेंसाठी काम करत असलेल्या विशेष टीमने काढला. कोल्हापूरच्या महापुरामध्ये शिवसेनेने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी काम केले. २०१४ च्या निवडणुकीतही शिवसेनेचे ६ आमदार कोल्हापूरमधून निवडून आल्याने कोल्हापूर आदित्य ठाकरेंसाठी अधिक सुरक्षित मतदारसंघ मानला जात आहे. विदर्भात मोदी लाटेमध्येदेखील शिवसेनेच्या दोन जागा निवडून आल्या होत्या. विदर्भामध्ये पाय घट्‌ट रोवण्यासाठी आदित्य ठाकरेंसाठी दिग्रज मतदारसंघ महत्त्वाचा मानला जात आहे. जळगाव (ग्रामीण) मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील सलग ३ वेळा निवडून आल्याने हा मतदारसंघही योग्य मानला जात आहे. मालेगाव (बाह्य) हा देखील शिवसेनेसाठी हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Aaditya Thackeray Constituency Politics