विविध उपक्रमांद्वारे मतदारांमध्ये जागृती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

मतदार जागृती आणि मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा यांच्या हस्ते बुधवारी (ता. १८) येथे उद्‌घाटन झाले.

मुंबई - मतदार जागृती आणि मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा यांच्या हस्ते बुधवारी (ता. १८) येथे उद्‌घाटन झाले.

राज्यात लोकसभा निवडणुकीत राबविलेल्या विशेष उपक्रमांवर आधारित आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या साहाय्याने तयार केलेल्या ‘पारदर्शक, सुरक्षित, उत्साही’ या नावाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मतदार जागृती वाहनाचे तसेच ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मोबाईल व्हॅनचे उद्‌घाटन केले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष टपाल तिकीट आणि टपाल आवरणाचे (कव्हर) प्रकाशनही करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा समावेश असलेल्या मतदार जागृती चित्रफितीचे उद्‌घाटनही याप्रसंगी करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Voter Awareness by Various activities