Vidhan Sabha 2019 : हात वर करुन मतदान करण्याची पद्धत आणली तरीही चालेल- पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

हात वर करुन मतदान करण्याची पद्धत आणली तरीही चालेल, पाऊस पडावा तशी माणसं भाजपमध्ये येत आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजप मध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रोज दोन दिवसांनी यादी तयार करत असे जंबो प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे असेही ते म्हणाले. 

मुंबई : हात वर करुन मतदान करण्याची पद्धत आणली तरीही चालेल, पाऊस पडावा तशी माणसं भाजपमध्ये येत आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजप मध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रोज दोन दिवसांनी यादी तयार करत असे जंबो प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे असेही ते म्हणाले. 

EVM 2004 पासून आहे मग शरद पवार यांना EVM भाजपला यश मिळते असे का वाटते? असा सवालही करून पाटील म्हणाले, "" पुलवामा घटनेमुळे भाजपचा विजय होत आहे असे काहींना वाटत आहे. देशात यापूर्वी गती आणि प्रामाणिक पणा राहिला असता तर आपण अमेरिकेच्या पुढे गेलो असतो. नागरिकांनी मोदींवर विश्वास दाखवला. विकासाच्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकलो. गेली पाच वर्षात लोकांना मतदान करायला हरकत नाही असे वाटले आणि लोकसभेला पुन्हा विजय झाला. सुखी करण्याचे,सुरक्षित करण्याचे काम भाजप सरकारने केले.'' 

मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,"" मराठा आरक्षण,धनगर आरक्षण देण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण सिंह होळकर यांच्यासह पाटण तालुक्‍यातील माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टे , अशोक साहू, दिनेश तावडे यांनी भाजपत प्रवेश केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha election Chandrakant patil speak on EVM in mumbai