
Ashok Chavan : अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याची मोठी ऑफर!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. राज्यात शिंदे-फडणवीस स्थापन झाल्यानंतर राजकीय नेत्यांचे पक्षांतर वाढले आहे. तसेच विरोधी पक्षांमध्ये अंतर्गत वाद देखील वाढले आहेत. दरम्यान भाजपने अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्यासाठी मोठी ऑफर दिली आहे.
अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहेत. त्यांनी आता विचार करायला हवा, अशी ऑफर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांनी दिली आहे. विखे पाटील म्हणाले, ज्या पक्षात अशोक चव्हाण आहेत. त्या काँग्रेस पक्षाचे भविष्य काय आहे?. नाशिक पदवीधरमध्ये व्यक्तिगत अजेंड्यावर निवडणूक झाली. यामध्ये पक्षाचा कुठे विचार झाला. अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदावर काम केले आहे. आदरणीय शंकरराव चव्हाण यांची मोठी परंपरा आहे.
विश्वनेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगाने स्विकारले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करण्याचा विचार अशोक चव्हाण यांनी करावा, असे विखे पाटील म्हणाले.
यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले होते. सत्तेत येण्यापूर्वी भाजपचा प्लान A म्हणजे अजित पवार, प्लान B एकनाथ शिंदे होता. त्यानंतर आता प्लान C अशोक चव्हाण आहे का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता.
राज्याचे मुख्यमंत्री आणि आपण स्वतः २०२४ मध्ये अनेक सरप्राइजेस देऊ असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, नेमकं शिंदे-फडणवीस अजून काय सरप्राईज देणार हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या तरी प्लान A, B, C D असे काही नसून, सध्या तरी प्लान गव्हरन्स आहे. सध्याच्या सरकारला गव्हर्नन्सवर फोकस करायचा असून, गेल्या अडीच वर्षापासून राज्य जे स्टँड स्टील झालं होतं, राज्याचा विकास जवळजळ थांबला होता. त्यामुळे राज्याला पुन्हा ग्रोथ पाथवर आणायचं लक्ष आहे. त्यासाठीच सध्या काम केले जात असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले होते.