विखे पाटील सोडणार भाजपची साथ? कोणत्या पक्षात करणार प्रवेश?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

  • विखे पाटलांचा 'यू टर्न'
  • बॅनरवरून रंगली चर्चा 

नगर : भारतीय जनता पक्षाचे नेते राधाकृष्ण पाटील यू-टर्न घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. विरोधीपक्ष नेतेपद सोडून सत्ताधाऱ्यांच्या गोटात सहभागी झालेले विखे आता भाजपची साथ सोडून सत्ताधारी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणार? असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. त्यांच्या श्रीरामपूरमधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन त्यांनी केलं. या कार्यक्रमाच्या फ्लेक्स बोर्डावरुन भाजप गायब होती. या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्ह्यातील किंवा राज्यातील कोणतेही नेतेही उपस्थित नव्हते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विशेष म्हणजे, या कार्यक्रम स्थळी लावलेला एक फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. चलो एक पहल की जाए… नए रस्ते की ओर… असं या होर्डिंगवर लिहिलं होतं. याचा नेमका अर्थ काय घ्यावा, यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. तत्पूर्वी, विखे पाटील यांनी 4 जून 2019 रोजी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर जुलै महिन्यात ते भाजपमध्ये सहभागी झाले. काही महिने त्यांनी गृहनिर्माण मंत्रिपदाची धुराही सांभाळली. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर ते शिर्डीतून पुन्हा आमदारपदी निवडून आले. मात्र भाजपला सत्ता राखता न आल्याने त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विखे पाटील शिवसेनेत होते. त्यामुळे रिव्हर्स गिअर टाकल्यास ते काँग्रेसमध्ये जाणार की शिवसेनेत, याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध नसल्याने राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता नाही.

Radhakrishna Vikhe Patil may take U Turn, ‘नये रास्ते की ओर…’ राधाकृष्ण विखे पाटील ‘रिव्हर्स गिअर’ टाकण्याच्या तयारीत?
फोटो क्रेडिट - टीव्ही 9 मराठी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikhe Patil may leave the BJP

Tags
टॉपिकस