Vilasrao Deshmukh : आजही हा नंबर लावा; विलासरावांचा आवाज ऐकू येईल! | Vilasrao deshmukh Birth anniversary toll free number to listen his speech | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vilasrao Deshmukh
Vilasrao Deshmukh : आजही हा नंबर लावा; विलासरावांचा आवाज ऐकू येईल!

Vilasrao Deshmukh : आजही हा नंबर लावा; विलासरावांचा आवाज ऐकू येईल!

राजकारणातील राजहंस म्हणून ओळख असलेले विलासराव देशमुख. विलासराव देशमुख हे जनतेमध्ये तसंच नेत्यांमध्येही लोकप्रिय होते. त्यांचे किस्से आजही लोकप्रिय आहे. अनेकजण त्यांचे अनुभव वेळोवेळी शेअर करत असतात.

विलासराव देशमुख कितीही कामात असले तरीही विलासराव देशमुख हे त्यांना आलेले फोन स्वतः उचलायचे. देशमुख यांना नेहमीच सतत लोकांमध्ये राहणे, त्यांच्याशी संवाद साधणे हे कायमच आवडायचे.

सर्वांच्या मनात त्यांनी महत्वाचे स्थान निर्माण केलं होतं. त्याच्या याच एका सवयीमुळे त्यांच्याशी अनेकजण थेट संवाद साधत. कुणीही विलासराव देशमुख यांना फोन केला आणि त्यांनी तो घेतला नाही, किंवा पुन्हा केला नाही, असं होत नसे. विलासराव देशमुख एखाद्या वेळी कामात खूप व्यस्त असतील तर त्यांना ते फोन करत असत.

विलासराव यांचा ९८२११२५००० हा मोबाईल नंबर आजही कित्येकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. लातूर मधली आणि आसपासच्या ग्रामीण भागातील अनेक मंडळी विलासराव देशमुख यांना थेट फोन करत संपर्क ठेवत असत. विलासरावांबद्दलचं लोकांच्या मनात असणारं हे प्रेम पाहून त्यांचा हा मोबाईल नंबर आजही सुरु ठेवण्यात आलाय.

या नंबरवर तुम्ही कधीही फोन करु शकता. फोन लावल्यानंतर तुमच्याशी विलासराव बोलत नाही पण, त्यांची गाजलेली भाषणे तुम्हाला ऐकायला जरूर मिळतील

टॅग्स :Vilasrao Deshmukh