विनायक मेटेंना आता भाजपकडून हवंय 'हे' पद

विनायक मेटेंना आता भाजपकडून हवंय 'हे' पद

पुणे : भाजप-शिवसेनेच्या (महायुती) मागील सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आता भाजपकडे नव्या पदाची मागणी केली आहे. 'विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देऊन भाजपने माझ्यावर झालेला अन्याय दूर करावा'', असे ते म्हणाले.

पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या भाजपच्या विधान परिषद आमदारांमध्ये मी सर्वांत ज्येष्ठ सदस्य आहे. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरही आपलाच हक्क आहे. आमची भाजपसोबत युती आहे. जिथं युती नाही तिथं स्वबळावर लढणार आहे, असे मेटे यांनी सांगितले. 

पंकजा मुंडे यांच्याशिवाय पानही हालत नाही

भाजपमधील ओबीसी नेत्यांच्या वादाबाबत मेटेंना विचारले असता ते म्हणाले, बीडमधील भाजपचे राजकारण पंकजा मुंडे यांच्याशिवाय पानही हालत नाही.

सर्व निवडणुका लढणार

शिवसंग्राम पक्ष राज्यातील सर्व निवडणुका लढवणार आहे. मात्र, जिथं भाजपसोबत युती आहे तिथं असेल आणि जिथं युती नाही तिथं स्वबळावर लढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com