Vinayak mete Death: शरद पवारांचा अमेरिकेतून फोन आला अन् मेटेंनी क्षणात राजीनामा दिला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar Vinayak Mete
शरद पवारांचा अमेरिकेतून फोन आला आणि मेटेंनी क्षणात राजीनामा दिला...

शरद पवारांचा अमेरिकेतून फोन आला अन् मेटेंनी क्षणात राजीनामा दिला...

शिवसंग्रामचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याची भावना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह अनेक प्रमुख नेत्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शरद पवारांसोबतचा त्यांचा एक किस्साही यानिमित्ताने चर्चेत आला आहे. (Sharad Pawar)

मार्च महिन्यात विधान परिषदेच्या काही आमदारांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी विनायक मेटे यांनी बोलताना शरद पवारांचा हा किस्सा सांगितला होता. राज्यातल्या १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत दत्ता मेघे यांचा पराभव झाला होता. तरी त्यांनी मंत्रिपद मिळालं. तेव्हा मेटे आमदार होते. पण राष्ट्रवादीतलं कोणीही तेव्हा मेघेंसाठी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार नव्हतं.

शरद पवार तेव्हा अमेरिकेत होते. त्यांनी अमेरिकेतून विनायक मेटेंना फोन केला. तिथून पवारांनी सांगितलं की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. त्यावर मेटे म्हणाले होते की, तुम्ही पक्षप्रमुख आहात, तुम्ही सांगाल तेच होईल. असं म्हणत कोणताही विचार न करता क्षणात राजीनामा दिला होता. त्यांचा हा किस्सा त्यावेळीही चांगलाच गाजला होता.