शिवसेना खासदारास धमकी देणाऱ्याला अटक

अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह वाकोला पोलिसांनी यांनी या इसमाला 24 तासांत अटक केली आहे.
vinayak raut
vinayak rautesakal

राजकीय वर्तुळात दररोज अनेक घटना घडत असतात. यात नेत्यांची एकमेकांवर टीका, टोलेबाजी सुरु असते. दरम्यान मागील काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांना फोनवरून धमक्या देण्याचे सत्र सुरु होते. आता या धमक्या देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या धमकी विरोधात विनायक राऊत यांनी मुंबईतील (Mumbai) वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिस त्या इसमाच्या शोधात होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त कर्णिक आणि वाकोला पोलिसांनी यांनी या इसमाला 24 तासांत अटक केली आहे.

vinayak raut
क्लब हाऊस अ‍ॅपप्रकरणी दोघे अटकेत; मुंबई पोलिसांची कारवाई

दरम्यान, राजकीय वर्तुळात अनेकवेळा अशा घटना घडत असतात. पक्षाच्या नेत्यांना धमकी, खंडणीसाठी निनाने फोन, पत्र अशी अनेक उदाहरणे आपण ऐकत असतो. मात्र 'मागील काही दिवस मला फोनवरून धमकी येत' असल्याची तक्रार खासदार विनायक राऊत यांनी पोलिसांत दिली होती. त्यांच्या या तक्रारीची दाद घेत अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.

अनेकवेळा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात काही कारणांनी टोलेबाजी सुरु असते. कोकणातील शिवसेना, भाजपा नेतेही एकमेकांवर निशाणा साधत असतात. मागील काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना कोकणात घडली होती. भाजपाचे निलेश राणे (nilesh rane) यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांना थेट धमकी दिली होती. या बातमीने कोकणात खळबळ उडाली होती. 'आमच्यावर टीका करताना जी भाषा वापरली जात आहे ती बदली नाही तर जिथे दिसाल तिथे मी तुम्हाला फटके घालीन', अशा शब्दांत निलेश यांनी राऊत यांना धमकावले होते. यावर खासदार राऊत यांनीही योग्य ती प्रतिक्रिया दिली होती.

vinayak raut
पुण्यातील शाळा बंदच राहणार? महापौरांनी दिली महत्वाची माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com